पुतळ्याच्या विटंबनेसह मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध

शहादा। देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात समाज कंटकाकडून पुतळ्याची विटंबना केली आहे. त्याच सोबत कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा निषेध नंदुरबार जिल्हा रा.काँ., शिवप्रेमी, शिवभक्त व समस्त मराठा समाजाच्यावतीने केलेला आहे. रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी प्रतिमा पूजन करून घटनेचा निषेध केलेला आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी कन्नडी राज्याचा जाहीर निषेध केला आहे.
शहादा शहरातील महात्मा ज्योतिबा व क्रांती ज्योतिबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा स्मारकासमोर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.अभिजित मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत पूजनासह माल्यार्पण करून वंदन केले. यावेळी शांतीलाल साळी, तालुकाध्यक्ष चिंतामणी पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्रकुमार, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दानिश पठाण, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पवाार, राजू वाघ, पं.स. सदस्य सुदाम पाटील, सुभाष शेंमळे, राजू बाविस्कर, छोटू कुवर, मिनाज मुन्शी, दिलीप जगदेव, महेंद्र कवर, जगदीश माळी, चुडामण सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, शुभम कुवर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.