जळगाव। लग्नाचे अमिष दाखवुन युवतीवर वारंवार अत्याचार करून फसवणुक केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील मुख्य संशयित परवेज शेख याच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, संशयित रईस शेख या पित्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो मंजूर करण्यात आला आहे.
वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने नाकारली
लग्नाचे अमिष दाखवुन पोलीस कॉन्सटेबल परवेज शेख याने युवतीवर ठिकठिकाणी नेऊन अत्याचार केला. तर फौजदार रईस शेख यानी अश्लील शब्द वापरून पिडीतेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दोन्ही पितापुत्राविरूध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी परवेज शेख या पुत्रास अटक केली होती. नंतर त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, पून्हा दोन दिवस वाढीव पोलिस कोठडी परवेजला सुनावली होती. शनिवारी परवेजच्या पोलिस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्याला शनिवारी न्यायाधीश एन.के.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर कामकाज होवून न्या.पाटील यांनी परवेजला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.
पिताला अटकपूर्व जामीन
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पुत्र परवेज शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर पिता रईस शेख याने अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज होवून रईस शेख याचा देखील अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी बचावपक्षातर्फे अॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.