पुनावळे येथील विवाहितेची आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : जमिनीचा व्यवहार तसेच घरगुती कारणावरून सासरच्या मंडळीकडून सातत्याने होणार्‍या छळास कंटाळून एका 34 वर्षीय विवाहितेने नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना पुनावळे येथे घडली. वनिता नारायण दर्शिले (वय 34) असे आत्महत्या करणार्‍या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वनिता यांच्या आई शोभा ताम्हाणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, वनिता यांचे पती नारायण उत्तम दर्शिले, दीर विलास उत्तम दर्शिले व जाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर जमीन खरेदी केल्याच्या कारणावरून वनिता यांच्या सतत छळ सुरू होता. या छळास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असे ताम्हाणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.