पुन्हा एकदा झळकणार अक्षय आणि तापसी पन्नूची जोडी

0

मुंबई : अक्षय कुमार आणि तापसी पन्नूची जोडी ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’सारख्या चित्रपटांतून एकत्र झळकली आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित असलेल्या ‘महिला मंडल’ चित्रपटातही आता तापसी असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटासाठी राधिका आपटे आणि विद्या बालनची निवड झाली असून आता तापसीचेही नाव समोर येत आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की हेच याही चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.