पुन्हा एकदा तळोजा एमआयडीसीत स्फोट; २ जण जखमी

0

रायगड : पुन्हा एकदा तळोजा एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत अचानक आग लागून भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २ दोन जण जखमी झाले आहेत.

या कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा असल्याने ही आग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान सातत्याने या आगीवर पाण्याचा मारा करत आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.