कोल्हापूर : पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली. बुधवारी फडणवीस कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर असतानाही घटना घडली आहे. सांगलीतील कार्यक्रम करुन कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडीलीमध्ये ऊस परिषदेला जाताना मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर तब्बल अर्धा तास भरकटले. त्यामुळे कार्यक्रमात पोहोचण्यासाठी त्यांना उशिर झाला.
दरम्यान, सकाळी मुंबईतून विमानाने मुख्यमंत्री बेळगावमध्ये पोचले. तिथून हेलिकॉप्टरने सांगलीत आले. सांगलीमधून हेलिकॉप्टर निघाल्यानंतर ते चुकून जोतिबा डोंगर आणि सादळे मादळे परिसरात गेले. नंतर चालकाला ही चूक लक्षात येताच पुन्हा महामार्ग आणि किणी वाठारमार्गे हे हेलिकॉप्टर वारणा कोडोलीमध्ये दाखल झाले. यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरच्या त्रुटींचा सामना करावा लागला आहे.