नवी दिल्ली-बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघाने ८ व ९ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी संपाचा निर्णय घेतला आहे.
देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे. मंगळवारी आणि बुधवारी संपाची हाक दिल्यामुळे तुमची बँकेतील महत्त्वाची कामं सोमवारीच करुन घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकते. अलाहाबाद बँकेने सेबीला पत्र पाठवून या दोन दिवशी बँक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, बँक ऑफ बडोदानेही असाच अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी २६ डिसेंबर रोजीही जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.