पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार बारगळला?

0

मुंबई: राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचे गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून आहे. आता निवडणूक चार महिन्यावर असताना मंत्रिमंडळ विस्तार होऊन नाराजांची नाराजी दूर केली जाणार आहे. उद्या १४ रोजी बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा बारगळल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारत कोणकोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गर्जना केल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे नेते पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती.