स्थानिक एक हजार कलाकारांनी घेतला महानाट्यात सहभाग
लोणावळा : लोणावळा व मावळवासीयांकरिता पुरंदरे शाळा मैदानावर आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रणरागिणी ग्रुप व लोणावळा विकास प्रतिष्ठानच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मंजुश्री वाघ, लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश परमार, कार्याध्यक्ष बाळासाहेब कडू, पुणे जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पुष्पा भोकसे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या महानाट्यांचे उद्घाटन करण्यात आले.
मोफत आयोजन केले
हे देखील वाचा
लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व शिवदुर्ग मित्रचे प्रवीण देशमुख लिखित निर्मित व दिग्दर्शित या महानाट्याचे रणारगिणी ग्रुप व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांनी मावळ व लोणावळावासीयांकरिता मोफत आयोजन केले होते. महानाट्यात सहभागी असलेले स्थानिक एक हजार कलाकार, शंभर फुटाचा भव्य रंगमंच, घोडे, उंट, बैलगाड्या, जिवंत तोफा, आक्रमक लढाया, नगारखाना, मेघडंबरी हे सर्व पाहण्याकरिता व छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा क्षण पाहण्याकरिता नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. नागरिकांना या महानाट्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांचा, लहान मुलांना या मो÷ठ्या रंगमंचाचे, उंट, घोडे याचे अत्यंत अप्रुप वाटत होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
दहा हजारांहून अधिक नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. ती पूर्ण भरुन नागरिक महानाट्य पाहण्याकरिता चौफेर उभे होते. लोणावळा शहर पोलिसांनी महानाट्याच्या ठिकाणी तसेच शहरात चोख बंदोबस्त नेमून कायदा व सुव्यवस्था राखत शहरातील वाहतूक कोंडी रोखण्याकरिता योग्य नियोजन केले होते. दरम्यान दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत गोरक्षण समितीचे आणि बजरंग दलाचे संदेश भेगडे, प्रतिक भेगडे, प्रणव दाभाडे, शिवांकुर खेर, योगेश ढोरे, शिवशंकर स्वामी, गौरव पाटील, सचिन जवळगे, गौरव विटे, अभिजित चव्हाण, श्रीकांत कोळी, अक्षय कुडलकर, भास्कर गोलिया यांनी सहभाग घेतला होता.