शिरपूर। नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या विशेष प्रयत्नाने शिरपूरचा चेहरामोहरा बदलणे शक्य झाल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले. ते अत्याधुनिक स्वरुपाचे रोड स्वीपर मशिनचे लोकार्पणप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी राजगोपाल भंडारी, सुभाष कुलकर्णी, प्रसन्न जैन, नितीन गिरासे, संगिता देवरे, छाया ईशी, सलीम खाटीक, आशा बागुल, रंजनाबाई सोनवणे, नाजीराबी शेख, सुलोचना पाटील, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.
लवकरच दोन रोड स्वीपर उपलब्ध
देश पातळीवरील व राज्य पातळीवरील अनेक विकासकामे शिरपुरात सर्वप्रथम होवून शिरपूर नगर परिषदेला अनेकदा मिळालेली पारितोषिके सर्वांसाठी बहुमानाची बाब आहे. आज 15 लाख रुपये किंमतीचे अत्याधुनिक रोड स्वीपर मशीनचे शहराच्या स्वच्छतेत भर घालण्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार असून लवकरच असे दोन रोड स्वीपर मशिन पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येतील. सर्व नागरिकांनीही स्वच्छ व सुंदर शिरपूरसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले.
जयश्रीबेन यांच्या हस्ते लोकार्पण
शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. स्वच्छ शहर व सुंदर शहर यासाठी 15 लाख रुपये किंमतीचे कॅम अविडा या अत्याधुनिक स्वरुपाचे रोड स्वीपर मशिन खरेदी करण्यात येवून त्याचे लोकार्पण नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
न. पा. प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, राजेंद्र पाटील गढी, संतोष माळी, लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल पाटील, राजू शेख, दिलीप बोरसे, पी. टी. पाटील, प्राचार्य सिद्धार्थ पवार, प्राचार्य आर. एन. पवार, किशोर चव्हाण, अशोक कलाल, स्वीय सहाय्यक सुनील जैन, पौर्णिमा पाठक, शि. मं.सदस्य किशोर माळी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष कुलकर्णी यांनी विविध योजनांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली तसेच सुरु असलेल्या विकासकामांची सविस्तर स्वरूपात माहिती दिली. आभार प्राचार्य सिद्धार्थ पवार यांनी मानले.