‘पुरस्कारामुळे अजुन चांगल्या कामासाठी उर्मी वाढते’

0

पुरस्कार वितरण समारंभात अभिनेते विजय कदम यांचे मत

पिंपरी : कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणार्‍या व्यक्तींसाठी एखादा पुरस्कार हा फक्त सन्मान नसतो. पुरस्कारामुळे त्या व्यक्तींचे मनोबल, धैर्य वाढवून जीवनाला प्रेरणा देतात. अजुन चांगले काम करण्यासाठी उर्मी देतात, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते विजय कदम यांनी व्यक्त केले.अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ माजी खासदार गजानन बाबर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. तसेच मदन वाघमारे यांना उद्योगभूषण, विनायक भोंगाळे यांना पिंपरी-चिंचवड भूषण, अशोक भुजबळ यांना सहकार भूषण, राजेंद्र गोरे यांना युवा भूषण, ज्ञानेश्‍वर बिजले यांना उत्कृष्ट वार्ताहर, महेंद्र ठाकूर यांना उत्कृष्ठ आर्किटेक्ट म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उद्योगपती ध्रुवशेठ कानपिळे, अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाउंडेशनचे गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.

पुरस्कारामुळे आत्मशक्ती वाढते
विजय कदम पुढे म्हणाले की, व्यक्तीला मिळालेल्या पुरस्कारामुळे समाजात चांगल्या गोष्टींचा पायंडा पाडला जातो. स्वतःच्या कष्टामुळे व कौशल्यामुळे मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजाकडून पाठीवर मिळालेली थाप आहे. तसेच, इतरांच्या मनात त्यापासून उर्मी निर्माण होते. काम करण्याची आत्मशक्ती आणखी वाढते. हाच जीवनाचा खरा आदर्श आहे. यावेळी मंगेश पाडगावकर यांची कविता सादर करून मनोगताचा शेवट केला.

अन्य पुरस्कारार्थी
या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्ञानेश्‍वर माने यांना आदर्श वस्ताद, विष्णू बनकर यांना अभियंता भूषण, कविता कडू पाटील यांना शैक्षणिक भूषण, निलेश फंड व संभाजी शितोळे यांना सामाजिक कार्यकर्ता, योगेश एंटरप्रायजेसला बांधकाम भूषण, अमृता नवले-वैशाली खराडे व मंगला जाधव यांना महिला भूषण, मनोज सेठिया यांना प्रशासकीय भूषण, प्राजक्ता रुद्रवार यांना महिला भूषण, अमर ताजणे यांना युवा उद्योजक, प्रदीप बोरसे यांना कामगार कल्याण अधिकारी, अ‍ॅ. संतोष ढोकले यांना अ‍ॅडव्होकेट, रमेश शेट्टी यांना कला गौरव, नंदु घुले यांना कुस्तीपटू, आदर्श कम्प्युटर्स यांना उत्कृष्ट कॉम्प्युटर यांना देखील कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुलाब बिरदवडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले.