पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा

0

पिंपरी : प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कामे करु लागल्या आहेत. कायद्याने त्यांना समान अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे महिलांच्या सणात पुरुषांनी सहभागी होणे हा देखील समान हक्क आहे, असे मानत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने नवी सांगवी येथे अनोखी वटपौर्णिमा साजरी केली. संस्थेच्या पुरुषांनी जन्मोजन्मी हीच बायको मिळण्यासाठी वडाच्या झाडाला फेर्‍या मारत त्याची पूजा केली. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अ‍ॅड. सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार, अरविंद मांगले, वसंतराव चकटे, पी. पी. पिल्ले, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शिवानंद तालकोटी, आप्पाजी चव्हाण, जीवन धवन, सतीश धावडे आदी उपस्थित होते.