सव्वा कोटींच्या विकासकामांना लोकप्रतिनिधींमुळे मंजुरी
मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी हतनूर प्रकल्पांतर्गत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील मेंढोदे व अजनाड या पुनर्वसित गावांसाठी सुमारे एक कोटी 25 लाख रुपयांची नागरी सुविधांची कामे मंजूर झाली आहेत. मेंढोदे हे गाव प्रकल्पामुळे बाधीत असून गेल्या 30 वर्षापासून या गावांच्या पुनर्वसनाची कामे आजगायत पूर्ण झाली नसल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे या गावाच्या संपर्कासाठी पूर परीस्थितीत अस्तित्वात असलेले रस्ते पाण्याखाली जातात. प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील पुराच्या पाण्यामुळे बाधीत होणार्या गावांमधील शेती, रस्ते, पूल करून देण्याबाबत वारंवार ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत होती. दरम्यान, मेंढोदे येथे समाज मंदिर, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्त्यांसह उघड्या गटारींची कामे होतील तसेच रावेर तालुक्यातील अजनाड येथे पंपगृहाचे मजबुतीकरणाचे काम होणार आहे.