जळगाव : मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पूजार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा
शहरातील एका भागात राहणारी महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात पुजेसाठी गेली असता पूजा करणार्या महाराजाने महिलेकडे वाईट नजरेने पाहत असल्याची महिलेने पाहिल्यानंतर याबाबत पतीला सांगितले होते. सोमवार, 2 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ती महिला मंदिरात पुजा करण्यासाठी गेली असता संशयीत राम बालकदास महाराजाने महिलेला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले व महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने रामबालकदास महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.