पूरनाड टोलनाक्यावरील लाखोंच्या वसुलीचा पेनड्राईव्ह बॉम्ब अधिवेशनात

Pen drive bomb of daily collection of lakhs at Purnad toll booth मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड चेकपोस्टवर दररोज अवैधरीत्या 10 ते 15 लाखांची लूट वाहनधारकांकडून केली जात असल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी केला होता. महाराष्ट्र-मध्यप्रदेश आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयांची वसुली होत असल्याचे पुरावेच राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसेंनी सभागृहात पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सादर केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खडसेंकडून सरकार धारेवर
यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांची रेकॉर्डिंगही अध्यक्षांना दिली आहे. या रेकॉर्डींगमध्ये तहसीलदारांना धमकीसह महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असल्याचेही खडसे यांनी सभागृहात सांगितले. खडसे यांनी वक्फ बोर्ड जमीन, रोहिणीताई खडसेंवरील हल्ल्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह सरकारला यावेळी धारेवर धरले.