पारोळा । तालुक्यातील चोरवड गावाजवळील वाघरे फाट्यावर चोरवड येथील पाच जणांनी पूर्ववैमनस्यातून दोघांना जबर मारहाण करत पैसे व सोन्याची चैन लुटल्याचा प्रकार घडला. भूषण निंबा पाटील व नितीन पाटील हे आपल्या दूचाकी (क्र.एमएच 19, बीआर-5826) ने चोरवडकडे जात असताना गावातील अनिल पाटील, जगदीश पाटील, विशाल पाटील, भाईदास पाटील, कमलाकर पाटील व सचिन पाटील यांनी त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वादातून त्यांना जबर मारहाण करत त्यांची 20 ग्रॅम सोन्याची चैन व रोख पाच हजार हिसकावून घेतले. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.