पूर्व वैमनस्यातुन प्रकाशा येथे एकाची हत्या

0

शहादा- प्रकाशा येथे पुर्व वैमनस्यावरुन एकाचा हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आल असून तणाव पुर्ण शांतता आहे. आरोपी रऊफ खाटीक, रफीक खाटीक, फारुख खाटीक, अहमद उस्मान खाटीक, मोइन खाटीक, समीर रउफ खाटीक यांनी मागील भांडणाची कुरापत काढुन शे हनीफ शे शमशोद्दीन याला लोखंडी सळ्यानी मारहाण केली त्यात तो जागीच ठार झाला.

दुपारी २ वाजता पोलीसांचा उपस्थितीत मयत शे हनीफ याचा दफन विधी करण्यात आला. पोलीस निरिक्षक संजय शुक्ल स्वतः घटनास्थळी थांबुन होते. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शे. फारुख शे शमशोद्दीन याच्या फिर्यादीवरुन वरील सहा आरोपींचा विरोधात कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.