सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून केली चिरफाड
नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अक्षरश: चिरफाड केली. ‘सिडकोचे भूखंड विकण्याचे अधिकार काँग्रेस आघाडी सरकारनेच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याच्याशी मुख्यमंत्री, नगरविकास खाते आणि महसूल खात्याचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगत तरीही ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ करण्यासाठी याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी घोटाळ्याचे खोटे आरोप केल्याप्रकरणीविरोधकांनीच राजीनामे द्यावेत, अशी मागणी करत विरोधकांची कोंडी केली.