जळगाव । नाशिराबाद नजीक पॅजो रिक्षा उलटल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. कासमवाडी परिसरातील रहिवाशी सिंधुबाई किसन गायकर वय 47 हया भाजीपाला विक्रेत्या असून त्या मुलगा ज्ञानेश्वर किसन गायकर वय 26 यांच्यासह नाशिराबाद येथे जात असतांना समोरून येणार्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पॅजो रिक्षा उलटली. यात सिंधूबाई गायकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मुलगा ज्ञानेश्वर व मालवाहू रिक्षाचालक रामेश्वर महाजन यांच्यासह दुचाकीस्वार तरुण देखील जखमी झाला आहे.