Inconvenience for passengers Again : Eight stops of Bhusawal-Devalali MEMU Canceled : Train will run from tomorrow भुसावळ : भुसावळ-देवळाली दरम्यान गुरूवारपासून गाडी सुरू होत असून मेमू गाडीचे आठ थांबे रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसाठठी ही बाब गैरसोयीची ठरणार आहे. काहीही उत्पन्न येत नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे. यामुळे लहान स्थानकावरून प्रवास करणार्या प्रवाशांना मोठीच अडचण निर्माण होणार आहे. या गाडीला आता रेल्वेने एक्स्प्रेस या गाडीचा दर्जा दिला आहे, त्यामुळे या गाडीला आता एक्स्प्रेस गाडीचे भाडे प्रवाशांना मोजावे लागणार आहे.
दोन वर्षानंतर प्रवाशांना दिलासा
कोरोनापासून भुसावळ-देवळाली (11114) शटल बंद करण्यात आली असून गाडी आता रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ जंक्शनवरून ही गाडी गुरुवार, 15 सप्टेंबरला सुटेल तर देवळाली येथून ही गाडी शुक्रवार, 16 सप्टेंबरला सकाळी 7.20 वाजता सुटेल. भुसावळ येथून ही गाडी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल. गेल्या अडीच वर्षापासून ही गाडी बंद होती, त्यामुळे अपडाऊन करणार्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. मात्र आता ही गाडी सुरू होत असल्याने चाकरमान्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
थांबे रद्दने होणार हाल
या मेमू गाडीचे रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरील आठ थांबे रद्द केले आहे. काहीही उत्पन्न येत नसलेल्या या गाडयांचे उत्पन्न नगण्या असल्याने रेल्वे प्रशासनाने लहान स्थानकावरील थांबे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या लहान थांब्यावरून अपडाऊन करणारे व विद्यार्थी यांचे हाल होणार आहे.
हे थांबे केले रद्द
भुसावळ-देवळाली मेमू गाडीचे आठ थांबे रद्द केले आहे. यात वाघळी, गुगाव, भादली, पिंपरखेड, पांजण, अस्वली, ओढा, समीट या स्थानकावरील थांबा रद्द केला आहे. एका स्थानकावरून कीमान संबंधित गाडीचे 25 तिकीटे तरी काढली गेली पाहीजे तरच तेथे गाडीचा थांबा असतो, मात्र या गाडीला अत्यल्प प्रवाशांचा प्रतिसादा असल्याने आठ थांबे रद्द केले आहे.
भुसावळ-वर्धा शुक्रवारपासून गाडी शुक्रवारपासून धावणार
दरम्यान भुसावळ वर्धा-भुसावळ (11121) ही गाडी शुक्रवारपासून दुपारी 2.30 वाजता सुटणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात वर्धा येथून शनिवार रात्री 12.5 वाजता सुटणार आहे. ती सकाळी 7.25 वाजता भुसावळात पोहोचेल.