निंभोरा- भुसावळकडून खडंव्याकडे जाणार्या पॅसेंजरखाली आल्याने निंभोर्याच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र शामराव पाटील (45) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत रवींद्र हा बर्हाणपूर येथे जात असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. मयत रवींद्रच्या पश्चात मुलगी, मुलगा, पत्नी व आई असा परीवार आहे.