थिरुअनंतपूरम-सध्या केरळात पावसाच्या पाण्याने थैमान घातले आहे. हजरो नागरिक बेघर आहे. केरळच्या जनतेच्या मदतीसाठी अनेकांकडून हात पुढे केले जात आहे. देशभरातून मदत दिली जात आहे. दरम्यान भारतातल्या अब्जाधीशांपैकी एक गणल्या जाणाऱ्या पेटीएमच्या मालकाने जेव्हा पुरग्रस्तांसाठी फक्त १० हजारांची मदत केली तेव्हा मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली.
कलाकारांनी स्वत: रस्त्यावर उतरून पुरग्रस्तांना मदत केली, काहींनी आपल्या घराचे दार खुले केले. तर इतर कलाकारांनीही लाखोंची मदत पुरग्रस्तांना केली. मात्र पेटीएमचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी केवळ १० हजारांची मदत केली म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. ज्याच्या घरात लक्ष्मी नांदते त्यानं तरी मदत करताना हात आखडता घेता कामा नये अशा शब्दांत त्यांची चांगलीच खरडपट्टी नेटकऱ्यांनी काढली.