‘पेट्टा’चा दक्षिणेत धुमाकुळ

0

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या ‘पेट्टा’ या चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवरही जोरात सुरूवात झाली आहे. तामिळनाडूत हा चित्रपट ५०० स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.

रजनीकांतच्या ‘पेट्टा’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, सिमरन, मालविका मोहनन, मेघा आकाश, बॉबी सिम्हा आणि तृषा यासारखे कलाकार आहेत.