नवी दिल्ली – सतत १६ दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोलच्या किमतीत बुधवारी अल्प घट झाली. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत ६० पैशांनी व मुंबईत ५९ पैशांनी घट झाली आहे. डिझेलची किंमत दिल्लीत ५६ पैशांनी व मुंबईत ५९ पैशांनी कमी झाली आहे.
दिल्ली- ७७.८६ प्रति लिटर
मुंबई-८५.६५ लिटर
कोलकाता – ७१.३० प्रति लीटर
चेन्नई – ७२.५८ प्रति लीटर
मागील काही दिवसांपासून इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसलेली आहे. या दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे.