चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकीची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चिंचवड, लिंकरोड येथे करण्यात आले. दुचाकीची अंत्ययात्रा काढत अनोख्या पद्धतीने पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला.