पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

0

पिंपरी-चिंचवड : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी निगडी ते पिंपरीपर्यंत सायकल रॅली काढली. निगडीतील भक्ती शक्ती चौकातून सकाळी 10 वाजता या सायकल रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी या मार्गे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शाहबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, लक्ष्मण रुपनर, नंदा तुळसे, मयुर जैयस्वाल, लक्ष्मण रुपनर, आबा खराडे, मनोज बिशप, सतिश भोसले, मकरध्वज यादव आदी सहभागी झाले होते.