पेट्रोल दरवाढी विरोधात भारत बंद असतांना आज पुन्हा दरवाढ

0

मुंबई-एकीकडे आज पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस सुरू असलेली इंधन दरवाढ आज देखील सुरूच आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा प्रत्येकी २३ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ८८.१२ रू. प्रतिलिटर तर डिझेल ७७.३२ रू. प्रतिलिटर झाला आहे. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ८०.७३ रुपये आणि डिझेलचा दर ७२.८३ रु. प्रतिलिटर झाला आहे. काल पेट्रोल १२ पैशांनी तर डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली होती. त्यामध्ये आज पुन्हा भर पडल्याने मोठा फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.