शिंदखेडा । पेट्रोल व डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ व परिणामी वाढलेली महागाई याच्या निषेधार्थ केंद्र व राज्यशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तालुका काँग्रेसच्या वतीने प्रेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एम. डी. मोरे यांनी देण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री व जेष्ठ नेते हेमंत देशमुख,जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुका अध्यक्ष रावसाहेब पाटील,प्रा सुरेश देसले, डॉ रवींद्र देशमुख आदी उपस्थित होते.
काय म्हटले आहे निवेदनात ?
इंधनावर कराचा बोजा टाकून महागाई वाढवत आहे. निरव मोदी व मल्ल्याचे बँकांच्या बुडावलेल्या हजारो कोटी रुपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्याने कमी झाल्या आहेत.परंतु वर्षभरात पेट्रोल 7 रुपयांनी तर डिझेल 4 रुपयांनी महागले आहे. गेल्या तीन वर्षात यांच्यात वाढ करून 19.48 टक्के शुल्क वसूल केले जाते. तसेच डिझेल 3.46 वरून 15.33 प्रतिलीटर वाढ केली आहे .सरकारने प्रेट्रोल डिझेलला जी. एस. टी च्या कक्षेत आणून तात्काळ इंधनाच्या किमती कमी कराव्यात. निवेदन देते समयी राजेंद्र देसले, किशोर पाटील, नगरसेवक सुनील चौधरी,उदय देसले,सुरज देसले, उल्हास देशमुख,राजेंद्र देवरे, दिनेश माळी, किरण जाधव, पंकज पाटील ,राकेश राजपूत, सुयोग भदाणे,महेंद्र भदाणे, किशोर ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, चंद्रकांत सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.