नंदुरबार । पेन्शनर संघटना पेन्शनरांचे संरक्षण, संवर्धन, संघटन व संचलन करून आपल्या सर्वस्तरीय व्यथा व कथा ऐकून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष सोमनाथ नाईक यांनी केले.तैलिक मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे वार्षिक सभा व मेळावा घेण्यात आला.
सभेत 15 ठराव मांडण्यात आले
वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या सभेत 15 ठराव मांडण्यात आले.या मेळाव्यास कार्याध्यक्ष सुभाष कुर्लेकर,कोषाध्यक्ष वासुदेव साठे,सरचिटणीस लक्ष्मण टेम्बे,विभागीय अध्यक्ष रा.जा. पवार,धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाचे कार्याध्यक्ष दयाराम पवार,जिल्हाध्यक्ष सिताराम शेवाळे,उपाध्यक्ष काशिनाथ राठोड, सचिव मधुकर साबळे,माजी अध्यक्ष चिंतामण पवार, शांतीलाल शिंदे, सहसचिव दिलीप पाटील,रामभाऊ कोळी, नारायण राजकुळे, नकुल वळवी, बन्सी पवार, शिवदास चित्ते,हिरकन भोई, भिमसिंग मोरे, रमेश माळी, आदि उपस्थित होते.
निवृत्ती सेवा पुरस्कार वितरण
सुरुवातीस सभासदांसह व इतर क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणार्या सभासदांसह निवृत्ती सेवा पुरस्कार मिळ विलेले सभासद नारायण राजकुळे, तानाजी पराडके, नकुल वळवी, गोविंद पाटील, भास्कर पाटील, भिमसिंग मोरे, शिवदास चित्ते, सिंधु सावंत, प्रतिभा कु ळकर्णी, मधुकर साबळे, रामभाऊ कोळी, व वयाचे 80 वर्ष पूर्ण करणार्या सभासदांचा सन्मान करण्यात आला.
सन 2017-18 च्या अंदाजपत्रकास मंजूरी
सन 2016-17 चे वार्षिक लेखा परिक्षण व तेरीज पत्रक ताळेबंदावर चर्चा करून मंजूरी घेण्यात आली. यावेळी सिताराम शेवाळे यांनी वर्षभरातील विविध उपक्रम व पेन्शनरांच्या समस्या सोडविण्यासाठी कामाची माहिती दिली. नाईक यांनी सांगितले की संघटन व संघशक्तीने समस्या सुटत असतात प्रश्न मार्गी लागून आर्थिक लाभ पदरात पडतात म्हणून संघटन बळकट करा. संघटनेचे सभासद व्हा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष आत्माराम इंदवे यांनी तर आभार आर.ए. कोळी यांनी मानले.