पेस, पूरव राजा उपांत्यपूर्व फेरीत

0

नवी दिल्ली । जागतिक टेनिस स्पर्धांमधील दुहेरीच्या लढतींंसाठी ताळमेळ जुळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या लिएंडर पेस आणि पूरव राजा या भारतीय जोडीने फॅबियो फोगनिनि आणि जेम्स सेरेटॉनी या जोडीवर सरळ विजय मिळवत सेंट पीटसबर्ग ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. भारतीय जोडीने एक तास 7 मिनिटे चाललेल्या सामन्यात इटली आणि अमेरिकेच्या खेळाडूंच्या या जोडीवर 6-3, 6-4 असा पराभव केला. पेस आणि राजा 10 पैकी चार ब्रेक पॉईंटचे गुण मिळवले तर पाचपैकी तीन ब्रेक पॉईंट वाचवले. अंतिम आठ जोडीच्या लढतींमध्ये पेस आणि राजाचा पुढील फेरीत मार्कस डॅनियल आणि मार्सेलो देमोलिनर या चौथ्या मानांकित जोडीशी होईल. या जोडीने पुन्हा एकत्र झाल्यावर ऑस्ट्रियाच्या ज्युलियन नोव्हल आणि अ‍ॅलेक्झांडर पेया या जोडीवर 3-6, 6-4, 10-6 असा विजय मिळवला होता.