पिंपरी-चिंचवड : महिलांसाठीच्या पे अँड पार्क तत्वावरील स्वच्छतागृहांमध्ये महिलांकडून जादा पैसे उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. मात्र, त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारांवर कारवाई करण्याचे अधिकार्यांकडून टाळले जात असल्याचा आरोप काही महिला संघटनांचा आहे. बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनची स्वच्छतागृहे ठेकेदारी पद्धतीवर चालवायला दिलेली असतात.
अशा वेळी ठेकेदारांचे स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असते. पे अँड युज तत्त्वावर ही स्वच्छतागृहे चालविण्यासाठी दिलेली असतात. मात्र, अशा स्वच्छतागृहांमध्येही महिलांकडून शौचालयाचा वापर करण्यासाठी बेकायदा पद्धतीने पैशांची लूट केली जाते. मुतारीचा वापर करण्यासाठी दोन रुपये व शौचालयाचा वापर करण्यासाठी पाच ते दहा रुपये आकारले जातात. मुतारीसाठी फक्त दोन रुपये शुल्क आहे. जादा पैसे आकारून महिलांची लूट केली. स्वच्छतागृहांची नियमावली सर्वांना माहीत नसल्याने पैसे भरून स्वच्छतागृहांचा वापर करण्यास महिला टाळाटाळ करतात. अशा स्वच्छतागृहांच्या समस्येत महिला अडकलेल्या आहेत.