पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून नंदुरबार जिल्ह्यात युवकाची हत्या !

0

नंदुरबार-पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाचा खून झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या देवाणघेवाण या कारणावरून छोटुराम सुनील वळवी (२०) वर्ष या तरुणास पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी व लोखंडी बाकने जबर मारहाण केली. डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी वस्तू लागल्याने छोटूराम वळवी हा जागीच ठार झाला.