यावल- शहरातील भास्कर नगराजवळील रहिवासी एका महिलेस किरकोळ कारणा वरून मारहाण केल्या प्रकरणी यावल पोलिसात एका विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी स्वाती रमेश मेवाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री साडेेनऊ वाजेच्या सुमारास त्या रतिलाल बडगुजर यांच्याकडेे आपल्या वडीलांचे घेणे असलेेले पैसे मागण्यास गेल्या असता बडगुजर यांनी तिला मारहाण करीत शिविगाळ केली, असे नमुद आहे.