पैशांसाठी विवाहितेचा छळ

0
निगडी : वेळोवेळी लाखो रुपये देऊन देखील सासरच्या मंडळींनी आणखी पैशांची मागणी केली. त्यास विवाहितेने नकार दिल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार प्राधिकरण निगडी येथे घडली. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती प्रफुल्ल इच्छाराम कापडे (वय 47), सासू पद्मावती इच्छाराम कापडे (वय 75), दीर दिनेश कापडे (वय 47), जाऊ श्रद्धा कापडे (वय 45), दीर अतुल कापडे (वय 51), जाऊ शुभांगी कापडे (वय 47) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा प्रफुल्ल याच्यासोबत 1999 साली विवाह झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. दरम्यान त्यांना एक मुलगी झाली. आरोपींनी त्या मुलीच्या शिक्षणासाठी फिर्यादी यांच्या वडिलांकडून वेळोवेळी 4 लाख 63 हजार 315 रुपये उसने म्हणून घेतले. ते परत दिले नाहीत. 2003  ते 2004 या कालावधीत आरोपी प्रफुल्ल याने फिर्यादी यांच्याशी अनैसर्गिक अत्याचार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.