पुणे-पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात १५ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. निखिल असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे. विनय राजपूत असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी विनय राजपूतला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत.