पैसे लांबविल्याप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

0

जळगाव । पिंप्राळा उपनगराकडे जाणार्‍या रस्त्यावरील पद्मालय अपार्टमेंटजवळ हवाला एजंटला लुटल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने आज जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बी. जे. मार्केटमधील हवाला एजंट नीलकंठ एजन्सीज’चे संचालक दिलीप दशरथ पटेल व त्यांचा भाचा प्रवीण पटेल या दोघांना लुटारूंनी रिव्हॉल्व्हर काढून त्यांच्या दिशेने रोखत सहा लाखांच्या रोकडसह दुचाकीही पळवून नेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसानी रईस हणिफ खान यास अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. दरम्यान, रईस याने न्या. घोरपडे यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी न्या. घोरपडे यांच्या न्यायालयात कामकाज होवून संशयित रईस खान याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

मारहाण प्रकरणी पोलिस कोठडी
जळगाव- बायकोच्या नावाने शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍यास एकाने डोक्यात फावडा मारून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी एकाला अटक केली असून त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता 1 फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आसोदा विक्रम देवसिंग बारेला यांच्याकडे मुलगी प्रियंका हिच्या लग्नानिमित्त रात्री पावरी नाचगाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी विक्रम बारेला यांचा शालक नवल रजाना पावरा हा आलेला होता. या कार्यक्रमात मिश्री शंकर बारेला (रा.फुपनगरी, ता.जळगाव मुळ रा.शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन) याने नवल याला बायकोच्या नावाने शिवीगाळ केली. याबाबत नवल याने मिश्री याला जाब विचारला असता त्याने जवळच असलेला फावडा उचलून नवल याच्या डोक्यात टाकला. जखमी केले होते. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मिश्री बारेला याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, बुधवारी मिश्री बारेला यास न्या. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 1 फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. विद्या राजपुत यांनी कामकाज पाहिले.