पैसे वाटपाच्या संशयातून निंभोर्‍यात हाणामारी, सात जण ताब्यात

0

रामचंद्र तायडे यांना जमावाने केली मारहाण ; पोटनिवडणूक चुरशीची

भुसावळ– तालुक्यातील निंभोरा येथील एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाल्याने दोन गटात पैसे वाटपाच्या संशयातून वाद निर्माण झाल्याने रामचंद्र तायडे यांना मारहाण करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह आरसीपी प्लाटूनने धाव घेतली. निंभोरा येथील सरपंच पदासाठी प्रचंड चुरस असून आपल्याच उमेदवाराची वर्णी लागण्यासाठी दोन्ही पॅनलमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. रामचंद्र तायडे हे मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा संशय आल्याने त्यांना जमावाने जोरदार मारहाण केली. या प्रकारानंतर पोलिसांनी तायडे यांच्यासह अन्य सहा जणांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.