नंदुरबार। ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घालावी तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांवर देशद्रोह आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकून त्यांची सर्व बँक खाती गोठविण्यात यावी. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची सखोल चौकशी करून त्यांचे कोणकोणत्या आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत. त्यांना विदेशातून मिळणारा निधी, त्यांची आगामी षड्यंत्रे आदींचा शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून असलेले निवेदन निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले. निवेदन देतांना हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, आकाश गावित, जितेंद्र मराठे, जय पंडित उपस्थित होते.