भुसावळ- तालुक्यातील शिंदी येथे पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी विवाहितेचे मंगळसूत्र लांबवण्यात आले. गुरुवारी दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. 12 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली. शिंदी येथील बौद्धवाड्यात गुरूवारी दुपारी भांड्यांना पॉलिश करून देणारे दोन युवक आले होते. भांडे पॉलिश करताना त्यांनी जयश्री जाधव यांचे मंगळसूत्र चमकावून देण्याचा बहाणा केला. दोन्ही संशयितांनी मंगळसूत्र घेऊन ते पाण्यात टाकले. याचवेळी संबंधित विवाहिता घरात गेल्याने दोन्ही संशयित पसार झाले. याप्रकरणी जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अजय माळी, प्रवीण पाटील पुढील तपास करत आहेत.