मुंबई । सन 2003 नंतर नेक्सा पी-वन पॉवरबोट शर्यतीच्या निमित्ताने मुंबईकारांना पहिल्यांदा बोटिंग शर्यतीचा अनुभवायला मिळणार आहे. दोन भारतीयांसह जगातील अव्वल 22 शर्यतपटू 3 ते 5 मार्च या कालावधीत होणार्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. या स्ंपर्धेत बहिण-भाऊ, भावंडाचाही समावेश आहे.त्यामुळे यास्पर्धेत कुटूंब रंगत आहे खेळात असे चित्र दिसत आहे.या स्पर्धेत अजुन विशेष आहे की, यामध्ये विश्वविक्रम नावावर असलेल्या केव्हिन बुडरेक आणि जॉन डॉनेल्ली या ब्रिटिश शर्यतपटू व दिशादर्शक (नेव्हिगेटर) यांचा समावेश असून पती पत्नी ही सहभागी झाले आहे.
कुटुंब रंगलंय..
या शर्यतीत बहीण-भाऊ आणि भावंडांचाही समावेश आहे. बुस्टर जेट्स संघात सॅम व डेजी कोलमन या बहीण-भावांनी, तर उल्ट्रा शार्क्स संघात नेल विलियम जॅक्सन व जेसन जॅक्सन आणि तर मर्लिन्स संघात जेम्स, जीलिन व ली नॉव्र्हल या भावांनी समावेश असल्यामुळे कुटुंब रंगलंय खेळात.. असे चित्र निर्माण झाले आहे.
संतोष व गिल नव्या भूमिकेत
मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांत अधिराज्य गाजवणारे सी. एस. संतोष आणि गौरव गिल हे भारताचे शर्यतपटू पहिल्यांदाच समुद्रावर होणार्या शर्यतीत सहभाग घेणार आहे. या शर्यतीसाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रीया दोघांनी दिली. ‘समुद्र आणि रस्ता यांच्यातील शर्यतीत बराच फरक असल्यामुळे ही शर्यत सोपी नसेल. तरिही शर्यतीत अव्वल कामगिरी करु,’ असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. पी-वन पॉवरबोट शर्यतीची अधिकृत घोषणा झाली त्यावेळी या स्पध्रेत सात संघांचा समावेश असेल असे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी केवळ सहाच संघांची ओळख करून देण्यात आली आणि विशेष म्हणजे सहाव्या संघात प्रायोजकच नसल्याने त्यांना ‘सहावा संघ’ असे नाव देण्यात आले.
संघ आणि शर्यतपटू
एचव्हीआर रेसिंग : फ्रँक सिल्व्हा व टोनी इयनोट्टा, डॅरेन निकोल्सन व जिओव्हॅन्नी कॅर्पिटेल्ला; लॉयड : क्रेग बिल्सन व विलियम एन्रिक्स, स्टुअर्ट क्युरेटन व सारा क्युरेटन; बूस्टर जेट्स : सॅम कोलमन व डेजी कोलमन, सी.एस. संतोष व मार्टिन रॉबिन्सन; उल्ट्रा शार्क्स : नेल विलियम जॅक्सन व जेसन जॅक्सन, गौरव गिल व जॉर्ज आयव्हे; मर्लिन्स : जेम्स नॉव्र्हल व ख्रिस्टियन पार्सन्स-यंग, जीलिन नॉव्र्हल व ली नॉव्र्हल; सहावा संघ : जॉन डॉनली व केव्हिन बुडरेक, अॅलेन कोप्पेन्स व फ्रेडरिक बॅस्टीन.
स्टुअर्ट, सारा क्युरेटन दाम्पत्य
सुरुवातीला मी आणि ती दोघेही एकमेकांसमोर स्पर्धेत उभे ठाकलो होतो. पण तिने कधीही फक्त स्वत:चा विचार केला नाही, तर मला दिशा दाखवली, तिने फक्त शर्यतीतच नाही तर आयुष्यातही मला दिशा दाखवली. ‘मी आणि ती’पासून आम्ही ‘श्री आणि सौ’ या नात्यात गुंफलो गेलो आणि आता मुंबईत एकत्रपणे शर्यतीत सहभाग घेतोय, ही कहाणी सांगत होता स्टुअर्ट क्युरेटन. स्टुअर्ट आपल्या पत्नी सारासह मुंबईत पहिल्यांदाच होणार्या नेक्सा पी-वन पॉवरबोट शर्यतीत सहभागी होणार आहेत. लॉयड संघातील स्टुअर्ट आणि सारा हे या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहेत.ब्रिटनचा रहिवासी असलेल्या स्टुअर्टने 11 वर्षांच्या कारकीर्दीत 200हून अधिक शर्यतींमध्ये सहभाग घेतला. 2011 आणि 2012मध्ये त्याने पी-वन 150 सुपरस्टॉक अजिंक्यपद स्पध्रेत जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या जेतेपदात सारा त्याच्यासोबत होती. व्यवसायाने जलतरण प्रशिक्षक असलेल्या साराने सात वर्षांच्या कारकीर्दीत 120 हून अधिक पॉवरबोट शर्यतीत सहभाग घेतला आहे.