पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतीस मंजुरी !

0

जळगाव: शहरापासून जवळ असलेल्या धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत राजपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पोखरी तांड्याला ग्रामपंचायत नव्हते. पोखरी तांड्याहून पाच किलोमीटर दूर असलेल्या एकलग्न या गावातून ग्रामपंचायतीचे कामकाज चालत होते. त्यामुळे पोखारीच्या नागरिकांना किरकोळ कामांसाठी पायपीठ करून एकलग्न जावे लागत होते. ही पायपीठ आता थांबणार आहे. पोखरी तांडा हे पूर्णत: बंजारा समाजाची वस्ती आहे. त्यामुळे विविध योजना राबिण्यात येत असतात. मात्र त्यासाठी दुसऱ्या गावातील ग्रामपंचातीत जावे लागते होते.

२०१२ पासून पोखरीला स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी होती, त्यासाठी प्रयत्न देखील सुरु होते. स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावे यासाठी समाजसेवक हिरालाल मानसिंग चव्हाण यांनी पाठपुरवा केला. कागद पत्रांची जमवाजमव करून हिरालाल चव्हाण यांनी मंत्रालय गाठत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना १३ सप्टेंबरला यश आले. १३ रोजी शासनाने राजपत्र काढत पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेबाबत आदेश दिले. यासाठी त्यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.