नंदुरबार । नगरपालिकेच्या प्रभाग क्र.2 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हरी मंगा चौधरी हे बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या हस्ते त्यांना पात्रतेचे प्रमाणपत्र देण्यात आले. नगरपालिकेच्या प्रभाग क्र.2 मधील काँग्रेसच्या नगरसेविका अनिता शिरीष चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर या प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात
आली. पालिका निवडणुकीला अवघे सहा महिने राहिल्याने पोटनिवडणुकीत भाग घेणे इच्छुकांनी टाळले. त्यामुळे काँग्रेसतर्फे एकमेव अर्ज असलेले उमेदवार हरी मंगा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्या हस्ते हरी चौधरी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मच्छिंद्र गुलाले, जयेश भैरव, ए.एम.पठाण आदी उपस्थित होते. अमळनेर नगराध्यक्ष पदासाठी अनिता चौधरी यांनी उमेदवारी केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर नंदुरबार पालिकेच्या प्रभाग क्र.2 मधील रिक्त जागा होती.