पोटनिवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

0

भुसावळ । तालुक्यातील खडका, गोजोरा व चोरवड या तीन ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सदस्यपदाच्या 3 जागांसाठी मतदान झाल्यानंतर सोमवार 29 रोजी सकाळी 9 वाजता मतमोजणी करण्यात आली. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयाबाहेर जल्लोष केला.

निवडणुकीत यांचा झाला विजय
खडका येथील माजी सरपंच प्रीती पाटील यांची पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याने तर कंडारी, गोजोरा व चोरवड येथे सदस्य अपात्र घाल्याने पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यात कंडारी येथे सुषमा संतोष सोनवणे तर गोजोरे येथे लता अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. यानंतर झालेल्या मतदानात खडका, चोरवड, गोजोरा येथे उर्वरित तीन जागांसाठी मतदान झाले होते. चोरवड येथे सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी लता सुभाष ठाकरे या 167 मते मिळवून विजयी झाल्या. खडके येथे पल्लवी पंकज सरोदे या 321 मते मिळवून विजयी झाल्या. गोजोरे येथे सुनंदा विनोद सपकाळे यांना 196 मते मिळवून विजयी झाल्या. तहसीलदार मीनाक्षी राठोड, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी ए.डी. सुरळकर, एस.एम. अहिरे यांनी कामकाज पाहिले.