जेजुरी : येत्या 13 डिसेंबरला होणारी जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांना बुधवारी सायंकाळी आदेशाचे पत्र पाठविण्यात आले आहे. या निर्णयामुळे 2016 मध्ये थेट जनतेमधून निवडून आलेल्या वीणा सोनवणे यांना दिलासा मिळाला असून, नगराध्यक्षपदी त्या कायम राहणार आहेत. पुढील चार वर्षे त्यांना कारभार पाहता येणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संभ्रमावस्था संपली आहे.