पोत्रात आढळला चिमुरडीचा मृतदेह

0

जळगाव । शहरातील समता नगरात राहणार्‍या 9 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह गोणपाटमध्ये बांधलेल्यावस्थेत धामणगाववाडा भागातील टेकडीवर आढळून आल्याने परीसरात एकच खळबड उडाली आहे. समता नगर टेकडी भागात सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कचरा फेकायला गेलेल्या एका महिलेला पोत्यात मृतदेह आढळला. रामानंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून परीसरात राहणार्‍या रहिवाश्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान तिच्या अत्याचार झाला की अजून काही वेगळे कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरोपीस अटक करण्याची मागणी
चिमुरडीवर अत्याचार करत तिचा खून केल्याचा संशय विविध संघटनांनी बळावला आहे. बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वैद्यकिय अधिका डॉ.निलेश देवराज, डॉ.प्रविण पाटील आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. निता भोळे यांनी मुलीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा सामान्य रूग्णालयात गल्लीत राहणार्‍या रहिवाश्यांसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गळादाबून खून?
मयत मुलीवर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा संशय काही तज्ञ नागरीकांकडून बोलले जात होते. ज्यावेळी मुलगी बेपत्ता झाली त्यावेळपासून रात्रभर मुलीच्या आईने व शेजारी राहणार्‍या मंडळींनी शोधाशोध घेतली. विशेष म्हणजे ज्याठिकाणी गोणपाटात मुलीचा मृतदेह आढळला त्याच ठिकाणी काही नागरीक दोन वेळा पाहून गेले होते. अगदी सकाळी 5.30 वाजेपर्यंत काहीही नव्हते. मात्र मोकळ्या जागेच्या परीसरात वस्तीत रहिवाशी असून देखील अज्ञात आरोपीने गोणपाटात मृतदेह आणूण 6.30 वाजेच्या सुमारास उकिरड्याजवळ फेकून दिला.

पोलिसांकडून कसून चौकशी
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम, उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रदीप चौधरी, गोपनीयचे राजेश पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन आपआपल्या स्तरावर चौकशी करायला सुरुवात केली. काही संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सकाळीच घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वानने धामणगाववाड्याला दोन वेळा मार्ग दाखविला.

कचरा फेकणाऱ्या महिलेच्या आले लक्षात
समतानगरात राहणार्‍या एक कुटुंबातील आठ वर्षीय चिमुरडी आपल्या आई व दोन भाऊ सोबत राहत होती. मंगळवार 12 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चिमुकली खेळत असतांना अचानक गायब झाली. नेहमीप्रमाणे मुलगी दररोज साडे सात ते आठ वाजेपर्यंत बाहेर खेळून घरी परतत होती. मंगळवारी रोजी ती घरी परत न आल्याने आईला यांची चिंता वाटू लागल्याने त्यांनी खेळणार्‍या परीसरात शोधा शोध करण्यास सुरूवात झाली. यावेळी परीसरात राहणार्‍या रहिवाश्यांनी देखील चिमुरडी अक्षराचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सर्वांनी रात्री 11.30 वाजेपर्यंत शोध घेतला. संपूर्ण समता नगर व टेकडीवर शोध घेतला, तरीही ती कुठेच आढळून आली नाही. त्यांनतर आपली मुलगी हरविली अशी माहिती रामानंद पोलीसात कळवून हरविल्याची नोंद घेण्यात आली. पोलीसांनी राहत्या घराजवळ चौकशी करण्यास सुरूवात केली. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सकाळी समता नगर परीसरात राहणारी महिला घरातील कचरा फेकण्यासाठी गेल्याने त्यांना गोणपाटीजवळ कुत्र्यांचा गोंधळ दिसून आला. त्या महिलेने कुत्र्यांना हटकले असता गोणपाटीतून एक हात आणि पाय दिसून आले. रात्री अक्षरा गायब झाल्याची या महिलेला माहिती असल्याने तिने जवळ जावून पाहिले तर तिचाच तो मृतदेह होता. घाबरलेल्या अवस्थेत या महिलेने अक्षराच्या घरी जावून मुलीच्या आईला माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गल्ली घटनास्थळी धावली. गोणपाटील आपल्या मुलीचा मृतदेह पाहून आई मनिषा यांनी एकच हंबरडा फोडला.

जिल्हा रूग्णालयात गर्दी
सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेह आढळून आल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली सकाळी घटनास्थळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. मृतदेहाचा पंचनामा करून पोलीसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी समता नगरातील नागरीक, तरूण व महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. ही गर्दी दुपारी 3 वाजेपर्यंत कमी होत नव्हती.