पोलादपूर । तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना-महाराष्ट्र रायगड जिल्हा शाखा पोलादपूरतर्फे तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. कार्यालयीन कामकाजादरम्यान 11 डिसेंबर 2017 रोजी ही निदर्शने करण्यात आल्याने कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती तालुकाध्यक्ष श्रीनिवास खेडेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना दिली. राज्यातील 10 लाख राज्य सरकारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना-महाराष्ट्र या संघटनेच्या निर्णय व निर्देशानुसार हे निदर्शने करण्याचे आंदोलन तहसील कार्यालयाबाहेर करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष श्रीनिवास खेडेकर, अशोक सुसलादे, व्ही.आर.जाधव, एस.ए.घोसाळकर, एस.यु.कांबळे, आर. डी. ससाणे, ए.के.मुंढेकर, दीपक ढुबे, डी.एस.साळुंखे, महाडीक, म्हात्रे, जगताप, एस.ए.पार्टे आणि अन्य सर्व कर्मचारी निदर्शने करत होते. तलाठी, गृह, पुरवठा, महसूल, निवडणूक तसेच सर्व शाखांच्या कर्मचार्यांनी यावेळी सहभागी राहून निदर्शने आंदोलन यशस्वी केले.