भुसावळ:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाकडून गुरूवारी सायंकाळी शांततेच्या वेळी आवाज क्षमतेची नोंद घेण्यात आली. (व्हाईस कंट्रोल सॅम्पल) मिरवणुकीच्या वेळी वाजविण्यात येणार्या वाद्यांच्या आवाजाची सु्ध्दा नोंद केली जाणार आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठया आवाजात वाद्य वाजविणार्यांवर कारवाई करण्यासाठी शांततेत आवाजाची चाचणी करणे गरजेचे असल्याने ही चाचणी घेण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, प्रमोद पाटील, साहील तडवी तसेच बाजार पेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार छोटू वैद्य, बाळू पाटील यांच्यासह दोन पंच उपस्थित होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशावरून ही चाचणी करण्यात आली.