ठाणे : लोकमान्यनगर भागातील कुख्यात गुंड तथा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील ‘टॉप 20’ मधील एक मुख्य आरोपी गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (20, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.