कोरेगाव भीमा दंगलीच्या धर्तीवर समिती स्थापन करण्याची आंदोलकांची मागणी
चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना दिले निवेदन
चाकण : गेल्या अनेकवर्षांपासून सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाची मागणी सुरू होती. नुकतेच राज्य सरकारच्यावतीने 16 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र या आरक्षणासाठी समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने, मोर्चा अशी लढाई सुरू होती. या आंदोलना दरम्यान चाकणमध्ये हिंसाचार झाला होता. त्यामुळे अनेक मराठा कार्यकर्त्यांवर मारधाड केल्याबद्दल गुन्हे नोंदविले होते. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेल्या निरपराध तरुणांवरील गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी जाहीर केलेले उपोषण पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीच्या धर्तीवर समिती स्थापन करावी व इतर काही मागण्यांचे निवेदन चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना यावेळी देण्यात आले.
हे देखील वाचा
शिष्टमंडळाने दिले निवेदन
यावेळी मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, मनोहर वाडेकर, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक मांडेकर, कालिदास वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, भगवान मेदनकर, बाबा राक्षे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे, प्रीतम परदेशी, राहुल नायकवाडी, गणेश पर्हाड, अतिष मांजरे, निलेश पानसरे, बाबाजी कौटकर, गणेश मांडेकर, विजय खाडे, रत्नेश वैरागे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मराठा आंदोलकांची अटकसत्र त्वरित थांबविण्यात यावे तसेच शासन, मराठा समन्वयक व पत्रकार यांची समिती स्थापन करण्यात यावी असे नमूद केले आहे.
सीसीटीव्ही फुटेज दाखवू शकत नाही
निवेदन स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील म्हणाले की, या निवेदन घेऊन शिष्टमंडळ आले होते. त्याबद्दल आम्ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समिती स्थापन करण्याचा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठ अधिकारी घेतील तसेच तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवता येणार नाही मात्र, तुमच्या मागण्यांचे निवेदन हे वरिष्ठ कार्यालयात पाठवून देणार आहे.