पोलिसांच्या पाल्यांसाठी रोजगार मेळावा

0

जळगाव। जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या पाल्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे रोजगार मेळावा होणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालक अनिसा तडवी यांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्यात राज्यातील उद्योजक उपस्थित राहणार असून विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.